Tuesday , March 19 2019

पती मयत अन् त्याच्या मारहाणीचा बनाव करत पत्नी जिल्हा रुग्णालयात दाखल

जळगाव : जामनेर तालुक्यातील नेरी येथे विवाहिता कोमल संदीप पवार हिने तिचे पती संदीप पवार याच्या डोक्यात फरशीचा तुकडा टाकून त्याचा खून केल्याची घटना 3 रोजी घडली. पती मयत असतानाही कोमल हिने पतीने मारहाण केल्याचा बनाव केला व जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनीही कुठलीही शहानिशा न करता पतीने मारहाण केल्याच्या कारणावरुन तिला उपचारार्थ दाखल करुन घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून राजकीय दबाव वापरुन आरोपी महिलेला मनोरुग्ण जाहीर करण्याचा प्रयत्न रुग्णालयाकडून होत असल्याचा आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेरी, ता.जामनेर येथे पत्नी कोमल संदीप पवार (21) हिने पती संदीप (26) याच्या डोक्यात फरशीचा तुकडा टाकून खून केल्याची घटना 3 मार्च रोजी सकाळी साडे पाच वाजता घडली होती. या घटनेनंतर कोमल हिनेही फिनाईल प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.या घटनेत कोमल हिला पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही.

उपचारार्थ औरंगाबाद न पोहचता महिला गेली माहेरी
पतीचा खून केल्यानंतर स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या कोमल हिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात 8 मार्चपर्यंत उपचार सुरु होते. येथे ज्या चाचण्या होत नाहीत, त्या चाचण्यांसाठी तिला औरंगाबाद 8 मार्च रोजी हलविण्याच्या सूचना डॉक्टरांनी केल्या. त्यानुसार कागदोपत्री प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर कोमल हिला रुग्णवाहिकेतून औरंगाबाद न नेता मोहाडी,ता.जामनेर या माहेरी नेण्यात आल्याचा आरोप संदीप याचे मेहुणे संतोष पाटील यांनी केला. दरम्यान, कोमल ही सात महिन्याची गरोदर आहे.

मारहाणीच्या कारणाने केले दाखल
कोमल हिने 9 मार्च रोजी मला पतीने मारहाण केली आहे असे सांगून मागील उपचाराचे कागदपत्रे डॉक्टरांना दाखविले. दुपारनंतर डॉ.मिलिंद बारी यांनी कोमल हिला दाखल करुन घेतले. कोमल हिला औरंगाबाद येथे हलविण्याच्या सूचना असतानाही तिला दाखल करुन घेण्यात आले. त्यासाठी कोणी राजपूत नावाच्या व्यक्तीचा प्रशासनावर दबाव होता. पैसे घेऊन कोमल हिला दाखल करुन घेतले. तिला मनोरुग्ण घोषीत करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप संतोष पाटील यांनी केला. दरम्यान, वैद्यकिय अधीक्षक डॉ.किरण पाटील यांच्या कार्यालयात डॉ.मिलिंद बारी यांना बोलावण्यात आले होते. तेथे संतोष पाटील यांनी बारी यांच्यावर आरोप केले. खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीबाबत पोलिसांना का कळविले नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

परिचारिकेला धक्काबुक्की
ज्या दिवशी कोमल हिला रुग्णालयात आणले, तेव्हा तिच्यासोबत आलेल्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयातील परिचारिका यांच्याशीही धक्काबुक्की केली व जबरदस्तीने तिला दाखल करुन घेतले असेही संतोष पाटील यांनी सांगितले. याआधी काय प्रकरण झाले ते मला माहित नाही, परंतु 9 रोजी पतीने मारल्याचे कोमल सांगत होती, म्हणून तिला दाखल करुन घेतल्याचा खुलासा डॉ.बारी यांनी डॉ.किरण पाटील यांच्या दालनात केला.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

होमगार्डचा प्रामाणिकपणा ; सापडलेली पैशांची पिशवी दिली पोलीस ठाण्यात

जळगाव : एकीकडे जिल्ह्यात तसेच शहरात पैशांची दरोडा, चोरीच्या घटना समोर येत आहे. तर दुसरीकडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!