पत्नीला ‘हार्टअटॅक’ अन् दोन दिवसांनी पतीची गळफास घेवून आत्महत्या

0

जळगाव- तालुक्यातील कुसूंबा येथील आईस फॅक्टरीजवळील रहिवासी दत्तू गणपत बगळे (वय 50) या हातमजुराने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी समोर आली आहे. दरम्यान त्यांच्या पत्नीलाही हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर औरंगाबादला खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पतीच्या आत्महत्येचे कळताच त्यांच्यासह मुलाने थेट औरंगाबादहून जिल्हा रुग्णालय गाठले होते.

दत्तू गणपत बगळे हे पत्नी आशा, दोन मुली व मुलगा विशाल यांच्यासह या कुटुंबासह वास्तव्यास होते. हातमजुरीकरुन ते उदरनिर्वाह भागवित होते. या कामी त्यांना त्यांचा मुलगा विशालही मदत करायचा. मोठी मुलगी सीमा हिचे लग्न झाले असून लहान मुलगी आश्‍विनी ही शिक्षण घेते.

भावजाई जेवणासाठी विचारला गेली अन् प्रकार उघड
कुसूंबा गावातच दत्तू बगळे यांचे लहान भाऊ कृष्णा बगळे राहतात. दत्तू बगळे हे घरी एकटे असल्याने त्यांना जेवणासाठी कृष्णा बगळे यांची पत्नी कविता ही विचाण्यासाठी गेली. दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी आवाज दिला. मात्र तरीही कुणीही आवाज देत नसल्याने त्यांनी शेजार्‍यांना प्रकार कळविला. यानंतर दरवाजा तोडल्यावर घरात पंख्याच्या सीलींगला गळफास घेतलेल्या अवस्थेत दत्तू बगळे यांचा मृतदेह दिसून आला. माहिती कळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक महेंद्र गायकवाड, नरसिंग पाडवी यांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.