पदग्रहण हा समारंभ नसून सामाजिक जीवनातील महत्वपूर्ण संस्कार

0

प्रशांत खोडके ; भुसावळात जेसीआय क्लबचा पदग्रहण समारंभ

भुसावळ- जेसीआय क्लबचा पदग्रहण समारंभ हा केवळ एक कार्यक्रम नसून तो सामाजिक जीवनात उपयोगी पडणारा महत्वपूर्ण संस्कार आहे. जेसीसमध्ये मेंबर्सना समाजाचा व स्वतःचा सर्वांगीण विकास करण्याची दिशा मिळते, असे प्रतिपादन झोनल व्हाईस प्रेसिडेंट प्रशांत खोडके यांनी केले. जेसीआय क्लब ताप्ती व्हँलीच्या पदग्रहण समारंभात ते बोलत होते. लाहोटी सभागृहात जेसीआय क्लब ताप्ती व्हॅलीच्या नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण समारंभ झाला. झेडव्हीपी प्रशांत खोडके प्रमुख पाहुणे होते. सीए मुकेश अग्रवाल, डॉ.विलास नेहेते, धमेंद्र मेंडकी आदींची उपस्थिती होती.

अध्यक्षपदी सरोज कुलकर्णी तर सचिवपदी राजश्री नवगाळे
कार्यक्रमात नवीन अध्यक्षा सरोज प्रशांत कुळकर्णी यांनी मावळते अध्यक्ष कपिल कांसल यांच्याकडून पदभार स्विकारला तर राजश्री तेजस नवगाळे यांनी सचिवपदाची सूत्रे स्वीकारली. रीया चांदवानी आणि अपूर्वा फेगडे यांनी सूत्रसंचालन केले. जेसीसला साथ अन् समाजाचा विकास हे ध्येयवाक्य ठेवून वर्षभर महिलांना व विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरतील, असे उपक्रम राबवू, असे प्रतिपादन नूतन अध्यक्षा सरोज प्रशांत कुळकर्णी यांनी केले. मयूर मनवानी, निखील तलरेजा, सचिन लालवानी व वेदश्री फालक यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.