परमेश्‍वर मानल्या जाणार्‍यांचे भारतात असेही होते स्मरण

0 3

आजही गावखेड्यात डॉक्टरला परमेश्वराचे रूप मानले जाते. दुर्धर आजारातून मुक्त झाल्यावर किंवा अपघातानंतर मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा जीवन सुरळीत झाल्यावर अनेकांना आपल्या डॉक्टरांमुळे आपल्याला पुनर्जन्म मिळाला अशी भावना असते. अनेक रूग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी डॉक्टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला देवदूत ठरत असतो. त्यांच्या कौशल्याने, ज्ञानाने अनेकांना जीवदान मिळते. भारतामध्ये 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो.

1 जुलै हाच दिवस डॉक्टर्स डे म्हणून का साजरा केला जातो हे जाणून घेणे तेवढेच रोचक आहे. हा दिवस भारताचे प्रसिद्ध चिकित्सक डॉ बिधान चंद्र रॉय यांचा जन्मदिवस. त्यांना श्रद्धांजली आणि सन्मान म्हणून 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणूनही साजरा केला जातो. तसा निर्णय 1991 साली भारत सरकारने घेतला. 4 फेब्रुवारी 1961 साली डॉ. बिधान चंद्र रॉय यांना भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान ’भारतरत्न’ बहाल करण्यात आला आहे.

डॉ. विधान चंद्र रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 मध्ये पाटणा येथे झाला. फिजिशियन डॉ.बिधानचंद्र रॉय हे पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री होते. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वामुळे रॉय यांना पश्चिम बंगालचे आर्किटेक्ट असेही म्हणतात. डॉ. बिधान चंद्र रॉय यांचे शिक्षण कोलकात्तामध्ये झाले. एमआरसीपी आणि एफआरसीएसची डिग्री लंडनमधून घेतली आहे. 1911 पासून त्यांनी भारतामध्ये वैद्यकीय सेवा देण्यास सुरूवात केली.

– डॉ. धर्मेंद्र पाटील
नेत्ररोग तज्ज्ञ, जळगाव, 9423187486