[व्हिडीओ] पर्यायी रस्त्याच्या मागणीसाठी शिवाजी नगरवासियांचे लाक्षणिक उपोषण !

0

जळगाव- शिवाजीनगर येथील पूल दुरुस्तीसाठी तोडण्यात आला आहे. मात्र पूल तोडण्यापूर्वी पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे आवश्यक होते, तसे न केल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतुक समस्येचा सामना करावा लागतो आहे. पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय हिंदू महासभेतर्फे महापालिकेसमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. दरम्यान उद्या २७ रोजी रेलरोको आंदोलनही केले जाणार आहे.