पवनाचे पाणी झाले दूषित!

0 1

धरणातून 1200 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग
पिंपरी-चिंचवड : गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पवना नदी पात्रातील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे पवना धरणातून आज (शुक्रवारी)एक तासासाठी पवना धरणातून 1200 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे नदी पात्रातील दूषित पाणी वाहून जाऊन शहरवासियांना स्वच्छ पाणीपुरवठा होणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरात दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणातून दिवसाला नदीपात्रत 30 ते 35 दक्षलक्ष घनफूट पाणी सोडले जाते. नदीपात्रातील पाणी रावेत येथे उचलून शुद्ध करुन शहरविसांना सोडले जाते. आजमितिला पवना धरणात 95.80 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी दूषित झाले असून शहरवासियांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे.

तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी दुषित झाले होते. गढूळ पाणीपुरवठा होत होता. त्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार आज एक तासासाठी पवना धरणातून 1200 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्याचबरोबर सोमवारपासून 1200 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना कोणताही धोका नाही’.