पहिली ते आठवीची परीक्षा रद्द; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

1

मुंबई: जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिली ते आठवीच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची दिली. नववी आणि अकरावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दहावीचे उर्वरित पेपर नियोजित वेळेप्रमाणेच होणार आहे. दहावीचे शिक्षक वगळता इतर सर्व शिक्षक घरून काम करणार असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.