पहुर येथे शिवसेना शहर शाखेच्यावतीने 51 कुटुंबांना अन्नदान वाटप

0

पहुर। जामनेर तालुक्यातील पहुर येथे शिवसेना शहर शाखेच्यावतीने कोरोनाच्या महासंकटामुळे 51 कुटुंब यांना गहू, तांदूळ, तेल, डाळ यांच्यासह लागणारे सर्व किराणा सामान गरजूना वाटप करण्यात आले. यापूर्वीही पहूर शहरात प्रथमच शिवसेनेने 80 टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या उक्तीप्रमाणे बाहेरगावाहून पोटापाण्यासाठी आलेले खरगोन जिल्हा मध्यप्रदेशातून बेघर कुटुंबांना संकटकाळी मायेचा आधार देऊन शिवसेनेने अशा 51 कुटुंबांना पुन्हा किराणा सामान वाटप केले. यावेळी शहर प्रमुख सुकलाल बारी, विभाग प्रमुख व पत्रकार गणेश पांढरे, विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र पांढरे, बापू सोनार, शेतकरी सेनेचे तालुका संघटक भाऊराव गोंधनखेडे, आरटी लेले शाळेचे प्रवेशक राजू पाटील यांच्यासह शहरातील शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.