पाईपलाईन चोरताना गस्तीपथक आल्याने चोरट्यांनी ठोकली धूम

0

रीक्षा जप्त ; मन्यारखेड्याच्या दोघांविरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा

भुसावळ- दीपनगर प्रकल्पाची राखाड वाहून नेणारी पाईपलाईन चोरीच्या प्रयत्नात सुरक्षा विभागाचे कर्मचारी आल्याने चोरट्यांनी जुनी रीक्षा घटनास्थळीच सोडून पलायन केल्याची घटना मन्यारखेडा शिवारात 12 रोजी रात्री 11.45 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी दीपनगरचे सुरक्षा अधिकारी अनिकेत चंद्रकांत कान्हेकर (रा.दीपनगर) यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी जयराम आगोणे (मन्यारखेडा) व अन्य एक अनोळखी इसमाविरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळावरून पाच हजार रुपये किंमतीची जुनी रीक्षा जप्त करण्यात आली असून पसार आरोपींचा कसून शोध सुरू करण्यात आला.