Saturday , February 23 2019
Breaking News

पाच दिवस बँका बंद राहणार ही अफवा; भाऊबीजेच्या दिवशी बँक सुरु

मुंबई – दिवाळीनिमित्त सलग ५ दिवस बँका बंद असल्याची अफवा सध्या पसरविली जात आहे. दरम्यान भाऊबीजेदिवशी राष्ट्रीयीकृत, सहकारी, आंतरराष्ट्रीय बँका सुरू राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट बँक एम्ल्पॉईज फेडरेशनचे सरचिटणीस देवीदास तुळजापूरकर यांनी दिली. दिवाळीत सलग पाच दिवस बँक बंद राहतील, ही अफवा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. 7 आणि 8 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडव्याच्या सार्वजनिक सुट्यांमुळे बंद राहतील तर 9 नोव्हेंबरला भाऊबीजेदिवशी बँकांचे सर्व व्यवहार सुरू राहतील, असेही ते म्हणाले.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

निवडणुकीपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांची उचलबांगडी होणार?

मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठविल्याचे खात्रिलायक वृत्त पंतप्रधानांच्या चोरुन चित्रीकरणाचा ठपका ठेवल्याचीही चर्चा कर्मचार्‍यांमध्ये दिवसभर गुर्‍हाळ  जळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!