पाच मिनिटांचा विलंब ; 18 विद्यार्थी लेखापाल परीक्षेपासून वंचित

0

श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रकार

भुसावळ- अवघ्या पाच मिनिटांचा विलंब झाल्याने तब्ब्ल 18 विद्यार्थी लेखापाल परीक्षेपासून वंचित राहिल्याची घटना मंगळवारी सकाळी शहरातील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीत घडली. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या माध्यमातून मंगळवारी अकाऊंटंट व ज्युनिअर ऑडीटर या दोन्ही पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली मात्र पाच मिनिटांच्या विलंबाने विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापूर्वीही कृषी विभाग व 2 मार्च रोजी झालेल्या परीक्षेपासूनही याच कारणाने विद्यार्थी वंचीत राहिले होते.

विलंबामुळे विद्यार्थी ठरले परीक्षेपासून वंचित
महा-आयटी व एका खासगी एजन्सीच्या माध्यमातून ज्युनिअर अकाऊंटंट व ज्युनिअर ऑडीटर या दोन्ही पदांसाठी मंगळवारी श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीत परीक्ष झाली. सकाळी नऊ वाजता केंद्रावर पोहोचण्याचा वेळ दिला असताना 18 विद्यार्थी पाच मिनिटांच्या विलंबाने आल्याने त्यांना परीक्षेपासून वंचीत ठेवण्यात आले. मनसे शहराध्यक्ष विनोद पाठक यांनी परीक्षा घेणार्‍या एजन्सीच्या अधिकार्‍यांसोबत चर्चा केली. बारकोड व अन्य प्रक्रिया पूर्वीच झाल्याने विलंबाने येणार्‍या परिक्षार्थींना प्रवेश दिला जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतल्याने विद्यार्थी माघारी परतले.