पाणीप्रश्‍नाविषयी दिले निवेदन

0

पिंपरी- चिंचवड स्टेशन, मोहननगर, काळभोर नगर व रामनगर येथील परिसरात वारंवार पाणी प्रश्‍न भेडसावत असतो. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होते आहे. या भेडसावणार्‍या पाणीप्रश्‍नासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निवासस्थानी जाऊन येथील रहिवाश्यांनी निवेदन दिले. आयुक्त कॉन्फरन्सकरिता बाहेरगावी गेले असल्याने त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे पाणी समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले. सदर निवेदन देण्यास गणेश लगोटे, रमेश कोठारी, विक्रम वहिले, संतोष धावडे, उदय नामदे, यू.यम .ठाकने, दशरथ पोटघन, लक्ष्मण शिंदे, विकास काळे, शुभम नामदे, अशोक देवासी, मोहनराव नाईक व प्रकाश हजारे आदी रहिवासी उपस्थित होते.