पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांचा पगार कोरोनासाठी: मंत्री गुलाबराव पाटील यांची घोषणा

0

जळगाव। कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचारी व अधिकारींचा एका दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याची मोठी घोषणा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. एवढेच नव्हे तर मंत्री म्हणून त्यांचा एक महिन्याचा पगारही ते सहायता निधीत जमा करणार आहेत. कोरोनाचा रुग्ण जरी जळगावात सापडला असला तरी तो बाहेरगावाहून आला आहे. त्यामुळे जनतेने घाबरून जाऊ नये, आरोग्य प्रशासन सज्ज आहे. जनतेने घरातच थांबून कोरोना विरूद्धचे युद्ध लढून शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही ना. पाटील यांनी केले आहे.