पार्किंगच्या जागेच्या व्यावसायिक वापर करणाऱ्या इमारतीवर हातोडा

0

महात्मा गांधीरोडवरील इमारतीवर केली कारवाई ;37 मिळकतधारकांना सकारण आदेश

जळगाव– मनपाच्या नगररचना विभागाने शहरातील इमारतीतील पार्किंगच्या जागेवर व्यवसायिक वापर करणार्‍यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यातील काही मिळकतधारकांना नोटीस बजावून सुनावणी देखील घेण्यात आल्या. दरम्यान, महात्मा गांधी रोडवरील पार्किंगच्या जागेवर बांधण्यात आलेले अनधिकृत बांधकाम पाडण्याचे सकारण आदेश नगररचना विभागाने दिले होते.त्यानुसार उपायुक्त अजित मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग आणि नगररचना विभागाने संयुक्तरित्या गुरुवारी कारवाई केली. व्यवसायिक वापर करणार्‍या शहरातील 450 मिळकतधारकांना नोटीस बजावण्यात आल्या असून 243 मिळकतधारकांची सुनावणी घेवून 37 मिळकतधारकांना करावाईचे सकारणआदेश बजावण्यात आले आहे.

मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमणाची कारवाई सुरु आहे. भंगार बाजार,गिरणा टाकी परिसरातील अतिक्रमण कारवाईनंतर प्रशासनाने पार्किगच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करुन व्यावसायिक वापर करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी मोर्चा वळविला आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महात्मा गांधी रोडवरील एका रेडीमेट कपड्याच्या शोरुमच्या इमारतीत पार्किंगच्या जागेवर बांधण्यात आलेल्या गोडाऊनचे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी मनपा उपायुक्त अजित मुठे,नगररचना विभागाचे इस्माईल शेख,अतुल पाटील,अतिक्रमण अधिक्षक एच.एम,खान यांच्यासह पथक गेले होते. दरम्यान, व्यावसायिक वापरासाठी गोडाऊनचे अनधिकृत बांधण्यात तोडण्यात आले.

कारवाई रोखण्यासाठी राजकीय दबाव

महात्मा गांधी रोडवरील एका रेडीमेट कपड्याच्या शोरुमच्या इमारतीत पार्किंगच्या जागेवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी मनपाचे पथक पोहचल्यानंतर कारवाईला सुरुवात केली. त्यावेळी एक माजी नगरसेवक त्याठिकाणी आले आणि राजकीय दबाव टाकत कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला.मात्र दबावाला न जुमानता पथकाने कारवाई केली.

शहरात 450 मिळकतधारकांना नोटीस

शहरातील इमारतींमध्ये पार्किंगच्या जागेवर गोडाऊन,मेडीकल,हॉटेल व्यावसायिक वापर करण्याबाबत मनपाच्या नगररचना विभागातर्फे सर्वेक्षण करण्यात आले होते. सर्वेक्षणाणंती 450 मिळकतधारकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यापैकी 243 मिळकतधारकांची सुनावणी घेवून देशपांडे मार्केट,नाथप्लॉजा,गोधळीवाले मार्केट येशील 37 मिळकतधारकांना सकारण आदेश बजावण्यात आले आहे.तर उर्वरित मिळकतधारकांना सकारण आदेश बजावण्याची नगररचना विभागातर्फे कार्यवाही सुरु आहे.