पार्थ पवार आणि बारणे एकाचवेळी तुकोबांच्या दर्शनाला

0

देहू- आज तुकाराम बीजनिमित्त वारकरी संप्रदाय जमला असून संकटातून मुक्त करण्यासाठी हे वारकरी तुकोबांच्या चरणी माथ टेकवत आहेत. याचदरम्यान एकाचवेळी मावळ लोकसभा मतदार संघातील प्रतिस्पर्धी असलेले श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार मंदिरात साकडे घालायला आले. त्यामुळे तुकाराम महाराज दोघांपैकी कोणावर प्रसन्न होतील, याची जोरदार चर्चा वारक-यांमध्ये रंगली आहे..

मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मिळाली आहे. त्यांनी प्रचार सुरु केले आहे. तर, शिवसेना-भाजप युतीची उमेदवारी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना निश्चित आहे. त्यांनीही आजच एकविरा देवीचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली.

तुकाराम बीज असल्याने देहूमध्ये राज्यातील कानाकोपऱ्यातून वारकरी संप्रदाय जमला आहे. एकाचवेळी प्रतिस्पर्धी असलेले श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार तिथे तुकाराम महाराजांना साकडे घालण्यासाठी आले. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. पार्थ यांच्यासोबत हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, नगरसेवक नाना काटे उपस्थित होते.

आता तुकाराम महाराज दोघांपैकी कोणावर प्रसन्न होतील, याची जोरदार चर्चा वारक-यांमध्ये रंगली आहे.