पालकमंत्र्यांच्या बैठकीत शिवसेनेचे पालकमंत्री उपस्थित !

0

मुंबई: राज्यात परतीच्या अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज काळजीवाहू सरकारच्या पालकमंत्र्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. राज्यातील भाजप-शिवसेनेतील सत्ता संघर्षामुळे शिवसेनेचे पालकमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार की नाही? याबाबत साशंकता होती. मात्र शिवेसेनेचे पालकमंत्री देखील या बैठकीला उपस्थित आहेत. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस उलटले आहे. मात्र अद्यापही सत्ता स्थापनेबाबत ठोस निर्णय झालेला नाही. दुसरीकडे पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने नवीन सरकार तातडीने बनण्याची गरज आहे.