पासेससाठी रावेर तहसिल कार्यालयात गर्दी

0

रावेर (प्रतिनिधी) – रावेर शहरात दंगलची संचारबंदी सुरु असतांना कोरोनाची संचारबंदी अजुन लागू नाही म्हणून तालुका भरातील अत्यावश्यक वस्तु विक्री करणाऱ्यां व्यापा-यांनी तुर्तास शहरासाठी कोणत्याही पासेस मागु नये असे आवहान तहसिलदार सौ उषाराणी देवगुणे यांनी केले आहे.

रावेर शहरात सद्या दंगलीची संचारबंदी सुरु असतांना अनेक व्यापारी अत्यावश्यक सेवा पुरवणारे दुकानदार यांनी कोणतीही पासे तुर्त मागु नका प्रांतधिका-यां कडून शिथिलच्या केलेल्या वेळेस आपण अत्यावश्यक सेवा जनतेला पुरवावी दंगलची संचारबंदी संपल्या नंतर कोरोनाची संचारबंदी शहरात लागू होईल त्यावेळेस दुकानदार,वाहतूकदार, व इतर अत्यावश्यक सेवा पुरवणा-या व्यापारी दुकानदार यांना पासेस दिल्या जाणार असल्याचे तहसिल प्रशासना कडून सांगण्यात आले आहे .