पिंपरी चिंचवडमध्ये ‘शिवभोजन’ योजनेचा शुभारंभ

0

पिंपरी :- गरीब आणि गरजू नागरिकांना 10 रुपयांत भोजन असलेल्या ‘शिवभोजन’ योजनेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड शहरात झाले. संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रूग्णालयातील उपहार गृह व वल्लभनगर एसटी स्टॅन्ड स्थानकातील उपहारगृहात या योजनेचा शुभारंभ शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते झाला.

यावेळी जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, अन्ननागरी पुरवठाचे नायब तहसीलदार दिनेश तावरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी महापौर योगेश बहल, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, मीनल यादव, नगरसेवक श्याम लांडे, अमित गावडे, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, संतोष सौंदणकर, सचिन सानप, कुणाल जगनाडे, अनिल सोमवंशी, सतीश मरळ, अमित शिंदे, प्रवीण पाटील, निलेश हाके, फझल शेख, सुनील लांडे, रामदास वानखडे, भोला पाटील, राजेश वाबळे, प्रतिक्षा घुले, शशिकला उभे, भारती चकवे, स्वरूपा खापेकर, पाटील काकू, दमयंती गायकवाड तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.