पिंपरी-चिंचवड खान्देश मराठा मंडळाच्या अध्यक्षपदी गुलाब सैंदाणे

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड खान्देश मराठा मंडळाच्या अध्यक्षपदी गुलाब सैंदाणे यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी मधुकर पगार व सयाजी पाटील, सचिवपदी मिलिंद पाटील, सहसचिवपदी अनिल सावंत, कोषाध्यक्षपदी भास्कर पाटील, हिशेबनीसपदी जयवंत गुलाब सैंदाणे शिसोदे, सदस्यपदी महेंद्र पाटील, सुरेश पाटील, प्रदीप पाटील, संजय शिंदे यांची निवड झाली आहे. सैंदाणे हे मूळ धुळे जिल्ह्यातील मुकटी येथील आहेत. निगडीतील सांस्कृतिक भवन येथे 33 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मावळते अध्यक्ष गंगाराम पाटील यांनी निवडीची घोषणा केली. ही निवड पाच वर्षांसाठी झाली आहे.