पिंपरी-चिंचवड परिसरातील भाजी मंडई आजपासून पुर्णतः बंद

0

पिंपरी: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुण्यातील काही बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील आणि परिसरातीलही भाजी मंडई बंद ठेवण्यात आल्या आहेत. भाजीपाला आणि फळे विक्री करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार भोसरी, चिंचवड, आकुर्डी, थोरगाव, पिंपरी, वाकड,सर्व आठवडे बाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. आज 11 एप्रिलपासून 14 एप्रिलपर्यंत आदेश लागू राहणार आहे. पोलीस प्रशासन या आदेशाची अंमलबजावणीकडे विशेष लक्ष देणार आहेत.