पिंपरी-चिंचवड मनपा भाजप गटनेते एकनाथ पवार यांचा राजीनामा !

0

पिंपरी : महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे गटनेते एकनाथ पवार यांनी आज सोमवारी अचानक तडकाफडकी राजीनामा दिला आहे. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली. भाजपची सत्ता येताच सभागृह नेतेपदी एकनाथ पवार यांची नियुक्ती झाली होती. त्यांना तीन वर्षाचा कार्यकाळ मिळाला. त्यांनी आज तडकाफडकी राजीनामा देण्याची घोषणा केली. पवार यांनी भाजपचे शहराध्यक्षपद भूषविले आहे. तीन वर्षात पक्षाने काम करण्याची संधी दिली मी समाधानी आहे. पुढील काळात पक्षाचे काम करणार आहे.