पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्र.17 मध्ये ड्रेनेज दुरुस्तीच्या कामांना वेग

0

ड्रेनेजचे काम पूर्ण होताच रस्ते डांबरीकरण करून प्रभागातील नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा देण्यावर भर

नगरसेवक नामदेव ढाके यांच्या पाठपुराव्याने विकासकामांना मिळाली गती

पिंपरी चिंचवड ः पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक 17 मधील विविध विकास कामांना गती मिळाली आहे. नगरसेवक नामदेव ढाके यांच्या वारंवार पाठपुराव्याने नलावडेवस्ती, गणेश कॉलनी, बिजलीनगर तसेच इतर भागांमध्ये अमृत योजनेच्या माध्यमातून जुन्या ड्रेनेज दुरुस्तीचे काम वेगाने सुरु आहे. पावसाळ्यात ड्रेनेज लिकेज होवून त्यातील सांडपाणी रस्त्यावर येते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशातच अनेक आजार पसरण्याची शक्यता असते. तसेच, डास उत्पत्ती होवून डेंग्यू सारख्या आजारांची लागण होण्याची शक्यता असते. ही समस्या लक्षात घेवून नगरसेवक नामदेव ढाके यांच्या तत्परतेने प्रभाग क्रमांक 17 मध्ये ड्रेनेज दुरुस्तीच्या कामांचा धडाका सुरु झाला आहे. सोमवार दि. 20 रोजी नगरसेवक नामदेव ढाके यांनी गणेश मंदिर परिसरातील विकासकामांची पाहणी केली. यावेळी, सामाजिक कार्यकर्ते अशोक बोडखे, वसंत नारखेडे, कुशल नेमाडे, रुपेश पाटील, राहूल पाचपांडे, योगेश महाजन, कैलास रोटे, प्रमोद चौधरी आदी उपस्थित होते.

नगरसेवक ढाके यांच्या तत्परतेच्या कामांमुळे प्रभागातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. प्रभागातील विकासकामांसंदर्भात नगरसेवक नामदेव ढाके म्हणाले की, सरकारच्या अमृत योजनेच्या माध्यमातून प्रभागातील ड्रेनेज लाईन दुरुस्ती तसेच नवीन डे्रनेज टाकण्याचे काम सूरू करण्यात येत आहे. प्रभागात ड्रेनेज लिकेज होण्यासंदर्भातील समस्या वाढू नये, यासाठी त्वरित दुरुस्तीच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळ्यात ड्रेनेजच्या समस्या वाढतात. त्यामुळे नागरिकांना खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा समस्या उद्भवू नये म्हणून आताच त्याचे निवारण करण्यावर भर दिला जात आहे. तसेच, ड्रेनेजच्या कामांमुळे या भागातील नागरिकांना वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण होवू नये, म्हणून पर्यायी मार्गाने वाहतुक करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांमधूनही या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ड्रेनेजचे काम पूर्ण होताच रस्ते डांबरीकरण करून प्रभागातील नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा देण्यावर भर असल्याचे ढाके यावेळी बोलताना म्हणाले.

गेल्या अनेक वर्षांपासून या भागात ड्रेनेज दुरुस्तीचे काम झालेले नव्हते. त्यामुळे ड्रेनेज लिकेज होवून रस्त्यांवर सांडपाणी ओसंडून वाहत होते. अशा दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे अनेक लहान-मोठ्या आजारांना सामोरे जाण्याचे प्रसंग नागरिकांवर आले आहे. पावसाळ्यातही अनेक समस्या उद्भवतात. या सर्व प्रकाराला आळा बसण्यासाठी ड्रेनेज दुरुस्ती आणि नवीन ड्रेनेज लाईनच्या कामांची आवश्यकता होती. नगरसेवक श्री. ढाके यांच्या माध्यमातून ड्रेनेजच्या कामांना मार्गी लावण्याचे काम या भागात सूरू आहे. पावसाळा अगोदरच हे काम पूर्ण होत असल्याची समाधानकारक प्रतिक्रीया या भागातील रहिवासी कोमलसिंग गिरासे यांनी दिली.
000000