बेपत्ता तरुणाचा मृतदेह मेहरुण तलावात आढळला

0

रामेश्वर कॉलनीतील रहिवासी

जळगाव : दोन दिवसांपासून घरुन बेपत्ता असलेल्या सुकदेव धोंडू भंडारे (27) रा. रामेश्वर कॉलनी तरुणाचा गुरुवारी सकाळी मेहरूण तलावात तरूणाचा मृतदेह आढळला आहे. नातेवार्ठकांनी ओळख पटविल्यानंतर तो सुकदेव भंडारे असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

भाजीपाला विक्रीचा करायचा व्यवसाय

आईचा मृत्यू झाल्यानंतर सुकदेव भंडारे हा मुळ सोनखेडे लपाली (ता.मोताळा ) येथील असून तो तसेच त्याचा भाऊ पांडूरंग असे दोघे जण शहरातील रामेश्वर कॉलनीत बहिण उषाबाई यांच्याकडे वास्तव्य करत. सुकदेव हा भाजीपालाची विक्री करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहास हातभार लावत असायचा. तर मेव्हुणे गजानन तसेच भाऊ पांडूरंग असे दोघे जण एमआयडीसीतील कंपनीत कामाला जातात. दि.03 रोजी सुकदेव सायंकाळी घराबाहेर पडला. उशिरापर्यत घरी न परतल्याने कुटुंबियानी त्याचा परिसरात शोध घेतला. बुधवारी नातेवाईकांकडे त्याची चौकशी केली असता तो कोठेही मिळून आला नाही.

पट्टीच्या पोहणार्‍यांनी काढला मृतदेह बाहेर

मेहरूण तलावात मृतदेह तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती परिसरातील नागरिकांकडून पोलिसांनी दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनचे हेड कॉनस्टेबल जितेंद्र राजपूत, पोलीस चालक रवींद्र चौधरी, नरसिंग पाडवी यांनी तलाव परिसरात धाव घेतली. तलावातील पाण्यात मृतदेह हा लांब तरंगत होता. त्यामुळे मेहरूण परिसरातील पट्टीच्या पोहणार्‍यांना पोलिसांनी पाचारण केले. त्यांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून काठावर आणला. याठिकाणी नातेवाईकांनी मृतदेह पाहिल्यानंतर ओळख पटली. त्यानंतर रूग्णवाहिकेतून मयताला जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविले. रूग्णालयात उपनिरीक्षक विशाल सोनवणे तसेच पोलीस नाईक शिवदास चौधरी यांनी पंचनामा केला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.