पीएमपीच्या बसला आग

0 1

पुणे : पीएमपीच्या बसेसला आग लागण्याचे प्रकार सातत्याने सुरूच आहे. बुधवारी रात्री कोथरुड डेपोजवळ पीएमपीच्या बसला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित आग विझवल्याने हानी टळली. यात पीएमपीचे मोठे नुकसान झाले.

पीएमपीची ही बस मार्गावर असताना बंद पडली होती. रात्री पीएमपीच्या कर्मचार्‍यांनी बस दुरुस्त करून ही बस कोथरुड डेपोला नेली होती. चालकाच्या सीटच्या खालच्या बाजूला असलेल्या इंजिनला अचानक आग लागली होती. या बसच्या शेजारून जाणार्‍या एका चारचाकी चालकाच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्याने चालकाच्या निर्दशनास ही बाब आणून दिली. त्यानंतर बस चालकाने बस थांबवून अग्निशमन दलाला फोन केला. अग्निशमन दलाने अवघ्या 10 मिनिटामध्ये आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेनंतर पुन्हा एकदा पीएमपीच्या बसेसला लागणार्‍या आगीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.