पीजे रेल्वे मार्ग ब्रॉड गेज करून बोदवडपर्यंत रेल्वे लाईन अंथरण्याची मागणी

1 1

खासदार रक्षा खडसे यांचा पावसाळी अधिवेशनात पाठपुरावा

भुसावळ- पाचोरा ते जामनेर नॅरो गेज रेल्वे मार्ग ब्रॉड गेज मध्ये रूपांतरीत करावा तसेच ही रेल्वे लाईन बोदवडपर्यंत आणावी, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी केली आहे. लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंगळवारी खासदारांनी मॅटर अंडर अर्जंट पब्लिक इंपोर्टन्स 377 च्या द्वारे पीजे मार्गाबाबत प्रश्‍न मांडून धरला आहे.
पाचोरा ते जामनेर नॅरो गेज रेल्वे मार्ग ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करून बोदवड पर्यंत वाढवण्यासाठी सर्वेक्षण 2017-18 मध्ये तरतूद करण्यात आली होती. या सर्वेक्षणाचे अंदाजपत्रक आणि अहवाल या वर्षाच्या सुरुवातीला रेल्वे बोर्डाकडे सोपवण्यात आलेला होता. या मार्गाला रेल्वे मंत्रालयाने 2018 च्या अर्थसंकल्पामध्ये मंजुरी मिळाली नाही. पाचोरा-भुसावळ-बोदवड हा मूळ मार्ग 102 किमी असून पाचोरा ते जामनेर नॅरो गेज रेल्वे मार्ग ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करून बोदवड पर्यंत 84 किमीचा मार्ग आहे. यामुळे सुमारे 18 किमीचा फेरा वाचणार असून या रूपांतरणा मुळे सदैव व्यस्त असलेल्या भुसावळ रेल्वे स्थानकाला बायपास करून हावड्याकडे जाणार्‍या अकोला किंवा नागपूर कडे जाणार्‍या मालवाहू गाड्या या मार्गाने चालवल्या मुळे रेल्वेचा चांगल्या पद्धतीने आर्थिक फायदा होईल. हा मार्ग जर पहुर पर्यंत वाढवण्यात आला तर जागतिक पर्यटन केंद्र असलेल्या अजिंठा लेणी ला ब्रँच लाईन बनवून जोडल्यास पर्यटकांची गर्दी सुरक्षा व सुविधांमुळे वर्षभर राहणार आहे.

1 Comment
  1. राहुल इंगळे जामनेर says

    मृत्यू शय्येवर येवुन ठेपलेल्या पिजे रेल्वेच्या संदर्भात तिच्या प्रशस्ती करना करीता रक्षा ताईंनी चालविलेल्या प्रयत्नांबद्दल मनस्वी आभार

Leave A Reply

Your email address will not be published.