पुणे आरटीओ कार्यालयाला वाहन नोंदणीद्वारे 4 कोटींचा महसूल

4

पुणे:– देशासह राज्यात कोरोना विषाणू मुळे पूर्णतः लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्या मुळे राज्यातील अनेक सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून काही अटी- शर्ती लागू करत काही भागातील सरकारी कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. पुणे शहरातील प्रादेशिक परिवहन ( आरटीओ) कार्यालय सुरू करण्यात आले आहे. पुणे आरटीओ कार्यालयाला गेल्या 8 दिवसात नवीन वाहन नोंदणीद्वारे 4 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

लॉकडाऊन काळात आरटीओ कार्यालयाचा दोनशे कोटीहुन अधिक महसूल बुडाला असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील आरटीओ कार्यालय 18 मे पासून सुरू करण्यात आले आहे. वाहन नोंदणीतून आरटीओ कार्यालयाला 4 कोटी 33 लाख, 86 हजार 755 रुपयांचा महसूल मिळाला असल्याची माहिती आरटीओ प्रशासनाकडून देण्यात आली.

सध्या आरटीओत केवळ वाहन नोंदणीचे काम सुरू आहे. परिवहन संवर्गातील वाहनांच्या कामकाजातून आरटीओला मोठा महसूल प्राप्त होतो. ही कामे सुरू झाल्याने महसुलात मोठी वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.