पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव दुचाकीची धडक बसल्याने पादचा-याचा मृत्यू

0

मोशी-मुलीला भेटण्यासाठी पायी निघालेले वैजनाथ लोंढे (वय 54) यांना भरधाव दुचाकीची धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 23) पुणे नाशिक महामार्गावर मोशी येथे मध्यरात्री घडली.

याप्रकरणी दुचाकीचालक राजेंद्र सहादू खैरे (वय 28, रा. साळुंखे वस्ती, ता. खेड) याच्यावर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पवन वैजनाथ लोंढे (वय 27, रा. बोराटेवस्ती, मोशी) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन हे आपल्या वडिलांसोबत वैजनाथ रामचंद्र लोंढे (वय 54) बहिण रेश्मा दीपक मुळे यांना भेटण्यासाठी पायी चालत जात होते. दरम्यान, पुणे नाशिक महामार्गावर मोशी येथे टोलनाक्याकडून भरधाव दुचाकी (एमएच 14, एफए 0206) येत होती. दचाकीची धडक बसल्याने वैजनाथ लोंढे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांचा या अपघातामुळे मृत्यू झाला. अधिक तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.