पुणे, पिंपरीत कोरोना बाधितांची संख्या वाढली

0

पुणे: शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून शनिवारी पुण्यात आणखी ९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८३ झाली आहे. तर पिंपरीमध्ये एकाच दिवशी नवीन सहाजण कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्ण संख्या नऊवर गेली आहे.
पुणे विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १०४ असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. त्यात पुण्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ७४ होती. शुक्रवारी एकाच दिवशी १४ नवीन रुग्ण आढळून आले होते. तर शनिवारी ९ नवीन रुग्ण आढळून आले. त्यातील ७ पुणे महापालिका हद्दीतील असून प्रत्येकी १ कॉन्टोन्मेट बोर्ड व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आहे. पुण्यात ८३ पिंपरी चिंचवड मध्ये १५ रुग्ण झाले आहेत.