पुण्यात गेल्या १२ तासांत ४ कोरोना बाधितांचा मृत्यू

0

मृतांची संख्या २० तर रुग्ण संख्या २०४ वर

पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या २० वर गेली असून त्यातील एक बारामती तर उरलेले पुणे महापालिका हद्दीतील मृत्यू आहेत. तर शहरात १६८ , पिंपरी चिंचवड २२, ग्रामीण १४ अशी एकूण २०४ रुग्ण संख्या नोंदवली गेली आहे. पुणे शहरात गेल्या १२ तासांत ४ कोरोना बधितांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यातील कोरोनाबधितांच्या मृतांची संख्या गुरुवारी २० वर गेली असून, त्यातील एक जण बारामती येथील भाजी विक्रेता आहे. तर उर्वरित १९ कोरोना बधितांचा मृत्यू पुणे महापालिका हद्दीत झाला आहे. तसेच आज पुण्यातील एकूण कोरोनाबधितांच्या संख्येत दुपारी बारा वाजेपर्यंत २९ ने वाढ झाली असून हा आकडा आता २०४ वर गेला आहे. १६८, पिंपरी चिंचवड २२, ग्रामीण १४ अशी एकूण २०४ रुग्ण संख्या नोंदवली गेली आहे.गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.