पुतण्याकडून काका पराभूत; बीडमध्ये संदीप क्षीरसागर विजयी !

0

बीड: विधानसभ निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. यात विशेषत:राष्ट्रवादी काँग्रेसने बीड जिल्ह्यात मुसंडी मारली आहे. परळी मतदारसंघात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना पराभूत करत भाजपला मोठा धक्का दिला आहे. त्यानंतर आता बीड मतदारसंघातही राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे काका जयदत्त क्षीरसागर यांना पराभूत करत विजयश्री खेचून आणली आहे.

महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या भावा-बहिणीच्या आणि काका-पुतण्याच्या रोमांचकारी लढाईत बीडमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. संदीप क्षीरसागर हे 1786 मतांनी विजय झाला असून त्यांनी काका जयदत्त यांना पराभूत केले आहे. संदीप क्षीरसागर यांनी शेटच्या क्षणापर्यंत काकांना टक्कर देत विजयश्री खेचून आणली. अटतटीच्या लढतीत संदीप यांनी विजय मिळवून विधानसभेची सीट काबिज केली. शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांना हा मोठा धक्का मानला जातो.