पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसला नांदुरा रेल्वे स्थानकावर थांबा

0
भुसावळ- नांदुरा रेल्वे स्थानकावर अप-डाऊन पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसला प्रायोगिक तत्वावर शुक्रवार, 8 मार्चपासून एका मिनिटांचा प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या गाडीला नांदुरा रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणी होत होती तर प्रवाशांच्या मागणीला आता यशही आले आहे. अप 12843  पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस नांदुरा रेल्वे स्थानकावर 7.14 वाजता आल्यानंतर 7.15 वाजता अहमदाबादकडे प्रस्थान करेल तर आठवड्यातून ही गाडी बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी धावणार आहे तर डाऊन 12844 गाडी नांदुरा रेल्वे स्थानकावर पहाटे 5.47 वाजता आल्यानंतर 5.48 वाजता पुरीकडे प्रस्थापन करेल. ही गाडी मंगळवार, शुक्रवार, रविवार, सोमवारी धावणार आहे. रेल्वे प्रवाशांनी सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.