पुरोगामी शक्तिंनी एकत्र येण्याची गरज ः सचिन साठे

0

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभेतील काँग्रेस कमिटीच्या पदाधिकार्‍यांची निगडी प्राधिकरणात बैठक

लोकसभा निवडणूकीत जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी समविचारी पक्षांची आघाडी

पिंपरी चिंचवड ः देशातील जातीयवादी शक्तींना लोकसभा निवडणूकीत रोखण्यासाठी समविचारी पक्षांबरोबर राष्ट्रीय पातळीवर आघाडी करण्यात आली आहे. भ्रष्ट व जातीयवादी सरकार विरुध्द पुरोगामी शक्तींनी एकत्र येऊन या निवडणूकीत त्यांना पराभूत करावे, असे आवाहन समविचारी सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांची बैठक झाली. या बैठकीत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभेतील काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक निगडी प्राधिकरणात रविवारी सकाळी साठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या सूचना मांडल्या. याची दखल घेऊ, असे साठे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

मित्रपक्षांच्या सन्मान राखावा..
मावळ व शिरुर लोकसभेच्या आघाडीच्या उमेदवारांचे काम करीत असताना काँग्रेस पक्षांच्या नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान आघाडीच्या उमेदवारांकडून व नेत्यांकडून राखला जाईल, अशी हमी अजित पवार यांनी दिली असल्याचेही साठे यांनी सांगितले. प्रचाराची पुढील दिशा ठरविण्यासाठी आघाडीच्या उमेदवारांची पुढील आठवड्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या शहराध्यक्षांसह, प्रमुख पदाधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. आघाडीतील मित्रपक्षांबरोबर भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ही सचिन साठे यांनी सांगितले.

बैठकीला यांची होती उपस्थिती…
या बैठकीस माजी महापौर कविचंद भाट, महिला प्रदेश काँग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, गौतम आरकडे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, राजेंद्रसिंह वालिया, बिंदू तिवारी, शहाबुद्दीन शेख, मकर यादव, लक्ष्मण रुपनर, हरी नायर, भाऊसाहेब मुगूटमल, सुनिल राऊत, किशोर कळसकर, राजाभाऊ गोलांडे, विष्णूपंत नेवाळे, बाळासाहेब सांळूखे, परशूराम गुंजाळ, सतिश भोसले, सर्ज्जी वर्की, किरण जैन, विशाल कसबे, बाबा बनसोडे, तानाजी काटे, अनिरुध्द कांबळे, माधव पुरी, दिपक जाधव, हूरबानो शेख, नंदा तुळसे, विनिता तिवारी, अलका काळे, शितल कोतवाल, सविता पवार, अनिता बोबडे, भास्कर नारखेडे, समशेर मिर्जा, चंद्रशेखर जाधव, संदेश बोर्डे, तुषार पाटील, वशीम शेख, रोहित शेळके, सौरभ शिंदे, अण्णा कसबे, राजेंद्र काळे आदी प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.