पुलवामात तीन दहशतवाद्यांचा खात्मा !

0

पुलवामा: दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये आज बुधवारी पहाटे सुरक्षा पथकांने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जहांगीर रफीक वानी, राजा उमर मकबूल भट आणि उझेर अहमद भट अशी या तीन दहशतवाद्यांची नावे आहेत.

जहांगीर रफीक वानी हिजबुल मुजाहिद्दीनचा त्रालमधील कमांडर होता. कमांडर हम्माद खानच्या मृत्यूनंतर सूत्रे त्याच्याकडे आली होती. नोव्हेंबर २०१९ मध्ये मेहराजुद्दीन झरगर, त्यानंतर गुलाम नबी मीर या नागरीकांच्या हत्येमध्ये या दहशतवादी गटाचा सहभाग होता. राष्ट्रीय रायफल्स, स्पेशल ऑपरेशन ग्रुप, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी मंगळवार संध्याकाळपासून या दहशतवाद्यांची शोध मोहिम सुरु केली होती.