पुलावरून ट्रक कोसळल्याने चालकाचा मृत्यू

0

यावल : समोरून आलेल्या भरधाव वाहनापासून वाचण्यासाठी रस्त्याच्या कडेला ट्रक घेण्याच्या प्रयत्नात ट्रक थेट पुलाखाली कोसळल्याची घटना  तालुक्यातील वाघोदे गावाच्या पुलावर रविवारी मध्यरात्री घडली. या अपघातात ट्रक चालक सामत कान्हा कटेरिया (37, रा.कडकान्हा, जि.राजकोट, गुजरात) हा ठार झाला. 11 ऑगस्टच्या मध्यरात्री सुमारे मध्यरात्री वाजेच्या दरम्यान यावलकडून चोपड्याकडे सोयाबीनचा भुसा भरून जात असलेला ट्रक (क्रमांक जी.जे. 12  ए.टी.7555)  हा पुलाचे कठडे तोडून पुलावरून सुमारे 30 फुट नदीपात्रात कोसळल्याने चालक ठार झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, समोरून भरधाव वेगात येणार्‍या कोबड्यांनी भरलेला मिनिडोअर (क्रमांक एम.पी.12 एच.470) या वाहनास चुकवण्याचा प्रयत्नात हा अपघात झाला. अपघातास कारणीभूत ठरलेला मिनीडोअर पोलिसांनी ताब्यात घेतला.