पेट्रोल, डिझेल दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

0

मुंबई – दोन दिवसांपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल न करता तिसऱ्या दिवशी तेल कंपन्यांनी दर वाढवले आहेत. आज गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

गुरुवारी पेट्रोलचे दर 11 ते 15 पैशांनी वाढले आहेत. दिल्लीत पेट्रोल 15 पैशांनी वाढून 76.43 च्या पातळीवर मिळत आहे. कोलकात्यात ते 79.33 रुपये आणि मुंबईत 83.87 रुपये प्रति लिटरने मिळत आहे. दुसरीकडे, चेन्नईत 79.39 रुपये प्रति लीटर दर आकारले जात आहेत.

डिझेलचे दर
डिझेल दिल्लीत एक लिटरसाठी 67.93 रुपये मोजावे लागत आहेत. बुधवारही हे दर 67.82 रुपये प्रति लीटर होते. कोलकात्यात डिझेल 70.69, मुंबईत 72.12 आणि चेन्नईत 71.74 रुपये प्रति लीटरने मिळत आहे.तथापि, मागच्या 2 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर होत्या. यादरम्यान, कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेली घसरणही थांबली. बुधवारी ब्रेंट क्रूडच्या दरात 0.2 टक्के वाढ झाली आहे. या वाढीसोबतच ते 72.56 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहे. दुसरीकडे, डब्ल्यूटीआय क्रूडच्या दरात 0.3 टक्के वाढ झाली आहे. या वाढीमुळे ते 67.86 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहे.