पैशांच्या वादातून तिघांसह तरुणीवर प्राणघातक हल्ला

0

चॉपरसह लाठ्या काठ्यांंचा वापर ः जखमी जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल; एका संशयितास अटक


जळगाव : पैसे उशीरा देण्याच्या कारणावरुन तांबापुर्‍यातील आठ ते नऊ जणांनी पैसे देण्यास आलेल्या तिघांसह एका तरुणीवर चॉपर तसेच लाठ्या काठ्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत शाहीन खाटीक वय 36 रा. बिलाल चौक, तांबापुरा, अकरम ईस्माईल खाटीक वय 23, शेख अशरफ शेख शकील, वय 22, फैजान खान अय्युबक खान वय 21 तिघे रा.मास्टर कॉलनी हे जखमी असून त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अरबाज सईद खाटीक (20), रा. बिलाल चौक यास अटक केली आहे. तांबापुरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पैसे देण्यास गेलेल्या तिघांवर चॉपरने वार

त्यानुसार अकरम हा अशरफ शेख शकील फैजान अजुब खान असे तिघे मजुरीचे पैसे देण्यासाठी 27 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास तांबाबपुरा भागातील बिलाल चौक येथे गेले. याठिकाणी अरबाज सईद खाटीक हा भेटला. त्याने त्याचे इतर मित्रांनाही बोलावून घेतले. यात कामाचे पैसे देत नाही, यांना सोडून एकेकाला पकडून मारुन टका, असे म्हणत शिवीगाळ तसेच मारहाण करण्यास सुरुवात केली. यात जुनेद याने चॉपरने अकरमच्या डाव्या हातावर फैजानच्या छातीवर व अशरफच्या कमरेवर वार केला. याच परिसरात अकरमची बहिणी वास्तव्यास आहे. तिला मारहाणीचे कळताच ती घटनास्थळी आली असता, जुनेने तिच्या हातावरीही चॉपरने वार केले. यासह इतरांनी लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण करुन कामाचे पैसे देत नाही. माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी अकरम ईस्माईल खाटीक याच्या फिर्यादीवरुन अरबाज सईद खाटीक, जुनेद सादिक खाटीक, जफर इकबाल, समद सलीम शेख, बाबा अमद खान, शेख शोएब उर्फ रफत शेख सलीम यांच्यासह इतर तिघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामाच्या पैशांसाठी सर्वांचा तगादा

मास्टर कॉलनी येथील अकरम ईस्माईल खाटीक याचा कॅटरिंगसाठी मजुर पुरविण्याचा व्यवसाय आहे. अकरमचा मित्र अशरफ याला बँगलोर येथे कॅटरींगसाठी 10 मुलांची आवश्यकला असल्याचा फोन आला. त्यानुसार त्योन अकरमला माहिती दिली. अकरम तांबापुर्‍यातील 92 गृपचे अरबाज सईद खाटीक व त्याच्यासोबत इतर 9 जणांना पाठविले. काम झाल्यावर सर्व जण बँगलोरहून परत आले. यानंतर अरबाजसह काम करुन परतलेले इतर सर्व जणांनी अकरमकडे कामाच्या पैशांसाठी तगादा लावला.