पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी

0

पुणे :- पोलीस कर्मचा-याकडून मुलाला होत असलेली मारहाण पाहून हा धक्का सहन न झाल्याने मोरेश्वर मेंगडे यांचा मृत्यू झाल्याची घटना चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याअंतर्गत येणा-या जनवाडी पोलीस चौकीत रविवारी घडली होती. पोलीस कर्मचा-याकडून मारहाण करण्यात आलेल्या अमोल मेंगडे याने वडिलांचा मृत्यूचा आरोप पोलिसांवर लावला होता. या घटनेची दखल घेत शिवसेनेच्या आमदार डॉ. निलम गो-हे यांनी मेंगडे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सात्वन केले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून संबंधित पोलीस कर्मचा-यावर कडक कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली.

या घटनेनंतर पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी अमित मेंगडे यांच्या घरी धाव घेऊन अमोलने दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित पोलीस कर्मचा-याची बदली करण्यात आली आहे. या पोलीस कर्मचा-यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी निलम गो-हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले आहे.