प्रवाशांना दिलासा : कुर्ला-नागपूर, पुणे-नागपूर विशेष गाड्या

0

भुसावळ : रेल्वे गाड्यांना होत असलेली गर्दी पाहता होळीच्या पार्श्वभुमीवर वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाकडून एलटीटी-नागपूर व पुणे नागपूर या दोन विशेष गाड्या रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाकडून लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर विशेष गाडीची एक फेरी होणार आहे. ही डाऊन गाडी 02031 लोकमान्य टिळक टर्मिनस येथून बुधवार, 11 मार्चला रात्री 12.45 वाजता सुटणार असून ही गाडी बुधवारीच दुपारी 2.10 वाजता नागपूरला पोचेल तर अप 02032 ही गाडी नागपूर येथून गुरूवार, 12 मार्च रोजी सायंकाळी 5.50 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी 7.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा आणि वर्धा स्थानकांवर थांबणार आहे. या गाडीला 14 स्लीपर क्लास, तीन वातानुकूलित तीन टियर, एक वातानुकूलित टू टियर आणि तीन जनरल डबे असतील. तसेच पुणे-नागपुर विशेष गाड़ी चालविली जाणार आहे, या गाडीची सुध्दा एक फेरी होणार आहे. डाऊन 02047 पुणे-नागपूर विशेष गाडी शुक्रवार, 13 मार्च रोजी सकाळी 10.45 वाजता सुटणार आहे. ही गाडी दुसर्‍या दिवशी रात्री दोनला ही गाडी नागपूरला पोहोचेल तसेच अप 01416 नागपूर-पुणे विशेष गाडी शनिवार, 14 मार्च नागपूरहून सकाळी 9.20 वाजता सुटेल. ही गाडी रविवारी पहाटे चारला पुण्यात पोहोचेल. ही गाडी कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा येथे थांबणार आहे. या गाडीला 14 स्लीपर क्लास, तीन वातानुकूलित थ्री टियर, एक वातानुकूलित टू टियर, तीन जनरल डबे असतील.