कोरोना: प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती

0

जळगाव– जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी म्हणजेच प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांची आता इन्सिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी जारी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा करण्याकामी कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचारी एनजीओ संस्था अथवा नागरिकांना खात्री करून स्वाक्षरीनिशी पासेस उपलब्ध करून देण्याचे अधिकार इन्सिडेंट अधिकारी म्हणून जिल्ह्यातील सर्व प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना प्रधान करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अधिनियमानुसार ही नियुक्ती त्यांच्या कार्यक्षेत्रात पुरती राहणार आहे. शासनाकडून आलेल्या विविध आदेशांचे व निर्देशांचे पालन इन्सिडेंट अधिकारी म्हणून करावयाचे आहे. तसेच देशाचे उल्लंघन करणार्‍याविरुद्ध कारवाईचे अधिकार देखील इन्सिडेंट अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आज जारी केले.