प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात प्राध्यापक, प्राचार्यांमध्ये वाद

0

भुसावळ- शहरातील शांती नगरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात प्राचार्य मंगला साबद्रा व प्रा.शुभांगी राठी यांच्यात शुक्रवारी दुपारी रजेच्या कारणावरून वाद झाला. यानंतर प्रा.राठी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. प्रा.शुभांगी राठी यांच्या आरोपानुसार, त्यांना प्राचार्याकडून मानसिक त्रास देण्यात आीला तसेच महाविद्यालयात नॅक कमेटी आल्यानंतर त्यासाठी निधी गोळा करण्यात आला व त्यासाठी बेसिकच्या बरोबरीने रक्कम मागितल्यानंतर ती आपण न दिल्याने आपल्यावर प्राचार्यांनी काढला असल्याचेही प्रा.राठी यांनी म्हटले आहे. प्रा.राठी यांचे पती सीए दिनेश राठी यांनी महाविद्यालय प्रशासन व प्राचार्यांवर आरोप केले आहे आहेत. याबाबत प्राचार्य मंगला साबद्रा यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी कुठलाही प्रतिसाद न दिल्याने त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.