प्राथमिक शिक्षक महासंघाच्या अधिवेशनासाठी गुरुजींना एका आठवड्याची रजा

0

अलिबाग: प्राथमिक शिक्षक महासंघाच्या १३ मार्च रोजी अलिबाग येथे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. अधिवेशनासाठी सरकारने ९ ते १४ मार्च अशी आठवडाभराची रजा शिक्षकांना मंजूर केली आहे. यावर्षी प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील अधिवेशन घेण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षक महासंघाच्या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.

शिक्षक संघाचे अधिवेशन राष्ट्रीय स्तरावरील असल्याने यावेळी राज्य शासनाने तीन दिवसांऐवजी ९ मार्च ते १४ मार्च अशी सहा दिवसांची अधिवेशन रजा मंजूर केलेली आहे ,याबाबतचे ग्रामविकास मंत्रालयाने परिपत्रकाद्वारे सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

प्राथमिक शिक्षकांना १०,२०,३० ही आश्वाशित प्रगती योजना , वैद्यकीय उपचारासाठी कॅशलेस सुविधा, संगणक प्रशिक्षण अट शिथिल करणे, जुनी पेन्शन योजना, शाळांसाठी मोफत वीज पुरवठा, वस्तीशाळा शिक्षकांची सलग सेवा , बी एल ओ च्या कामातून वगळणे या मागण्या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत.