प्राध्यापकांचा मदतीचा हात, एक दिवसाचे वेतन देणार

0

जळगाव – राज्यभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारसमोर मोठे आव्हान उभे आहे. यासाठी विविध उपाययोजना राज्य सरकारकडून आखल्या जात आहेत. त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर प्रचंड ताण येत आहे. समाजाचे आपणही काही देणे लागतो या भावनेतून समाजातील एक संवेदनशील घटक म्हणून प्राध्यापकांनी राज्य सरकारला आर्थिक मदत देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातील प्राध्यापक वर्गाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून.या कठीण समयी संपूर्ण प्राध्यापकांचे एक दिवसाचे वेतन शासनास देण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबत बऱ्याच प्राध्यापकांशी चर्चा केली असता त्यांनीही आपण या समयी सरकारसोबत राहूया अशी ग्वाही दिल्याचे एन-मुक्ता अध्यक्ष तथा अ.भा.रा.शै. महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.नितीन बारी यांनी सांगितले.