Sunday , March 18 2018

प्रार्थना-वैभव पुन्हा एकत्र दिसणार!

मुंबई । ‘कॉफी आणि बरंच काही’ आणि ‘मि. अँड मिसेस सदाचारी’ या चित्रपटातील प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्त्ववादी ही जोडी रसिकांची फेव्हरेट ठरली होती. दोघांची ऑनस्क्रीन केमेस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावल्याने ही जोडी पुन्हा कधी एकत्र येते याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली होती. “What’s up लग्न’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने प्रार्थना-वैभव पुन्हा एकत्र दिसणार असल्याने ही जोडीच यंदाचं ‘व्हॅलेंटाइन कपल’ आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

‘व्हॅलेंटाइन डे’ म्हटला की दिवसभर आपल्या प्रिय व्यक्तीसोबत धम्माल करायची. सकाळी उठल्यापासूनचा प्रत्येक क्षण तिच्यासोबत घालवायचा. यात भेटवस्तू देणं, कॉफी शॉपमध्ये जाऊन गप्पा मारणं, निसर्गरम्य स्थळी जाऊन आपल्या जीवनातील रोमँटिक क्षण कैद करण्यासोबतच आपल्या प्रिय व्यक्तीला जे आवडतं ते करण्यातच स्वत:चा आनंद मानणं हेसुद्धा आलंच. वैभव-प्रार्थना हे यंदाचं व्हॅलेंटाइन कपल या चित्रपटात अशाच प्रकारचे रोमँटिक क्षण साजरे करताना दिसणार आहे. फिनक्राफ्ट मीडिया’ अँड ‘एन्टरटेन्मेंट प्रा. लि’. या बॅनरखाली तयार चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन विश्‍वास जोशी यांनी केले आहे. जाई जोशी व व्हिडिओ पॅलेस हे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. हा चित्रपट 16 मार्चला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

हे देखील वाचा

पर्यटक बनून बनावट नोटा वटवणार्‍या बंगालच्या तरुणाला पकडले!

उरण । दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा वटविणार्‍या एका भामट्याला मोरा पोलिसांनी अटक केली. उरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *