प्रियांका बॉलीवूड सोडतीये ?

0

मुंबई – प्रियांकाला इंटरनॅशनल स्टार मानली जाते. मात्र देसी गर्ल प्रियांका चोप्रा आता पूर्णपणे झालीये विदेशी. सलमान खान च्या “भारत” ला मध्येयच सोडून आता प्रियांकाने संजय लीला भन्सालीला हि नाकारले आहे. संजय एक गँगस्टर ड्रमा सिनेमा बनविण्याच्या तयारीत होते मात्र आता हे शक्य होणार नाही असे दिसून येत आहे.

संजय लीला भन्साली आणि प्रियांकाने २ सुपरहिट सिनेमा एकत्र केले होते “रामलीला” आणि “बाजीराव मस्तानी”, या दोन्ही चित्रपटात प्रियांका भन्साली सोबत दिसली होती. मात्र आता यांची जोडी पून्हा पहायला मिळेल कि नाही हा मोठा प्रश्न आहे. प्रियांका सध्या एका हॉलिवूडच्या प्रोजेक्टवर काम करत आहे. या सिनेमात प्रियांका क्रिसपॅट सोबत स्क्रीन शेयर करणार आहे.

बॉयफ्रेंड निक जोनस सोबत आता साखरपुडा केल्याची चर्चा सध्या बॉलीवूड मध्ये पसरली आहे, हे कारणही असू शकते सिनेमा न स्वीकारणाचे. पण असे बॅक टु बॅक बॉलीवूडचे सिनेमा नाकारण्याने प्रियांका बॉलीवूड सोडत आहे की काय असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.