प्रेमसंबंधांतून धमकी : तळोद्यातील तरुणाची आत्महत्या

0

तळोदा- पतीजवळ सुखी नाही म्हणून पळून जाऊन लग्न करू; तसे केले नाही तर तुझ्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करू,अशी धमकी एका महिलेने दिल्याने तळोद्यातील 22 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तळोद्यातील खान्देश गल्लीत राहणार्‍या शिवम उर्फ रोहित मुरलीधर सूर्यवंशी याच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याप्रकरणी सुचिता पंकज कर्णकार व शशिकांत वसंत शेंडे या दोघांविरोधात तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मुरलीधर तुकाराम सूर्यवंंशी यांनी फिर्याद दिली आहे. शिवम याचे सुचिता या विवाहितेशी दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाला सुचिताचे पती शिशिकांत शेंडे यांची संमती होती मात्र, शिवमने लग्नास नकार दिला. लग्न केले नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी सुचिताने दिली. तसेच माझ्या पत्नीला पळवून घेऊन जा, नाहीतर तुला खोट्या तक्रारीत फसवून टाकू, अशी धमकी देण्यात आली. या प्रकरणाचा धसका घेत शिवमने गळफास घेतला.