Tuesday , March 19 2019

प्रेमासाठी वाट्टेल ते…. अल्पवयीन तरुणीला गावठी कट्ट्याच्या धाकावर घातली गळ

अट्रावलच्या प्रेमविरासह चौघांची पोलिसांनी आवळल्या मुसक्या

यावल- अल्पवयीन तरुणीने प्रेम करावे या मागणीसाठी अट्रावलच्या प्रेमविराने थेट तिला गावठी कट्टाच लावल्याने भेदरलेल्या तरुणीसह पालकांनी यावल पोलिसात धाव घेतल्यानंतर अट्रावलच्या प्रेमविरासह यावलच्या तिघांची पोलिसांनी मुसक्या आवळत गावठी कट्टा जप्त केला.

पोलिसात तक्रार दाखल होताच आवळल्या मुसक्या
बुधवारी दुपारी यावल पोलिस ठाण्यात अट्रावल येथील एका कुटुंबीय तक्रार देण्याकरीता आले होते. त्यात अट्रावल येथे एका तरूणाकडे कट्टा असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर निरीक्षक डी.के.परदेशी, पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, डीबीचे हवालदार असलम खान, संजय देवरे, सुशील घुगे, राजेश वाडे, विजय जावरे, पंकज फिरके या पथकाने अट्रावल गाठले. गिरीष अनिल लोहार या तरूणाकडे चौकशी केली तेव्हा त्याने गावातील राजेंद्र बाबुराव लोहार, अशोक गोवर्धन तायडे यांची नावे पुढे केली तेव्हा तिघांना ताब्यात घेत गावठी कट्ट्याबद्दल विचारणा केली असता तिघांनी हा कट्टा यावल शहरातील बोरावल गेट भागात राहणार्‍या युवराज राजु भास्कर राहणार यांच्याकडे असल्याचे सांगीतले. पोलिस पथकाने तिघांना घेत यावलमधील बोरावल गेट येथे येथून युवराज भास्करला गावठी कट्ट्यासह ताब्यात घेतले. या कारवाई मुळे शहरात व तालुक्यात एकचं खळबळ उडाली आहे तर या चौघां विरूध्द यावल पोलिसात आर्मअ‍ॅक्ट सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, हवालदार संजय तायडे करीत आहे.

Spread the love
  •  
  • 22
  •  
  •  
  •  
    22
    Shares

हे देखील वाचा

बिबट्याची मादी जेरबंद

ओतूर : जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथे बिबट्याची मादी पिंजर्‍यात जेरबंद झाली. रविवारी वडगाव कांदळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!