प्लास्टिक पिशव्या जप्त करुन पंधरा हजार रुपयांचा दंड

0

व्यावसायिकांवर पालिकेने कारवाई

शहादा। शहरात संचाबंदी सुरु असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद असतांना चोरी छुपे मांस विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर पालिकेने कारवाई करत त्यांच्याकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करुन पंधरा हजार रुपयांचा दंड थोटविण्यात आला.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव चिंताजनक आहे.कोरोनाचा प्रसार रोखता यावा यासाठी संपूर्ण देश १४ एप्रिलपर्यत लॉकडाऊनमध्ये राहणार आहे. शहरात लॉकडाऊन कडकडीत पाळला जात असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच सेवा बंद करण्यात आल्या आहेत.शहरात गर्दी होणार नाही यासाठी पोलीस आणि पालिका प्रशासन कार्यरत असतांना प्लास्टिक पिशवीवर बंदी असतांना संचारबंदीत प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याचे पालिका मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी कारवाई सुरु केली आहे.

शहरात काही भागात चोरी छुपे मांस विक्री होत असून प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्याने मुख्याधिकारी वाघ यांनी स्वतः मांस विक्रीच्या दुकानात जावून प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. यात सादगार चिकन सेंटर,यादगार चिकन सेंटर, नूर चिकन सेंटर ह्या दुकान चालकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड थोटविण्यात आला.