फडणवीसांकडून खूप काही शिकलो; उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचे कौतुक !

0

मुंबई: विधान सभेच्या विरोधी पक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीनंतर सर्वपक्षीय नेत्यांनी निवडीबद्दल भाषण केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील अभिनंदन पार भाषण केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच वर्षात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खूप काही शिकलो अशा शब्दात कौतुक केले. तसेच आमची मैत्री ही लपविण्यासारखी नाही आणि ती मी कधीही लपविलेली नाही असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

जे विरोधात होते ते आज आमचे मित्र झाले आणि जे मित्र होते ते आज विरोधात आहेत यावरून थोडेसे वाईट देखील वाटत आहे असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. चांगल्या कामाआड कधीही पक्ष येणार नाही. पदावर बसून न्याय देऊ शकलो नाही तर मी अपराधी असेल असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

मी येथे कधी येईल असे बोललो नव्हतो पण आलो असे म्हणत देखील त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.