‘फुलराणी’ सायना नेहवाल भाजपात !

0

नवी दिल्ली: फुलराणी म्हणून ओळखली जाणारी भारतीय बॅडमिंटपटू सायना नेहवालने आज बुधवारी २९ रोजी भाजपात प्रवेश केला आहे. बॅडमिंटनमध्ये सायना नेहवालने उत्तुंग कामगिरी केली आहे. आता खेळाव्यतिरिक्त भाजपात प्रवेश करत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. सायना नेहवालसोबत तिच्या मोठ्या बहिणीनेही भाजपात प्रवेश केला. प्रवेशानंतर आता सायना नेहवाल दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करणार आहे.

सायनाने ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदकाची कमाई केली आहे. २०१५ मध्ये सायना नेहवाल जागतिक रॅकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर येणारी पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू ठरली होती. सध्या ती नवव्या क्रमांकावर आहे.

“मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत अनेक पुरस्कार जिंकले आहेत. आज देशासाठी चांगले काम करणाऱ्या पक्षात मी प्रवेश करत आहे. कष्ट करणारे लोक मला आवडतात. नरेंद्र मोदी देशासाठी खूप मेहनत घेतात. नरेंद्र मोदींनी क्रीडा क्षेत्रासाठी खूप काम केले आहे. त्यामुळे मी भाजपात प्रवेश केला आहे असे सायना नेहवालने म्हटले आहे.