फैजपूरच्या आखाड्यात महिला मल्लांची पुरूषांसोबत कुस्ती

0

फैजपूर- मुन्सिपल हायस्कुलमागील पटांगणावर हिंदू-मुस्लिम एकता मंचतर्फे कुस्तींच्या आमदंगली झाल्या. त्यात मध्यप्रदेश, राजस्थान, हरीयाणा, औरगाबाद, चाळीसगाव, मालेगाव, रावेर, बोदवड, मुक्ताईनगर, वरणगाव, भुसावळ येथील मल्लांनी आखाडा रंगवला. चाळीसगांव येथील चार महिला पहेलवान यांनी पुरूष पहेलवानांसोबत कुस्ती खेळली तसेच अखेरची लढत राजस्थान येथील अली शेर अलवर अज्जु पहेलवान व रसलपूर येथील तय्यब पहेलवान यांच्यात झाली. कुस्ती पाहण्यासाठी पंच क्रोशीतून हजारोच्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती
कुस्त्यांची जोड लावताना अनिल चौधरी, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, माजी प्रभारी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक शेख कुर्बान हाजी करीम, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, माजी उपनगराध्यक्ष शेख जलिल हाजी सत्तार, उपनगराध्यक्ष कलिम खाँ मण्यार, नगरसेवक रशीद तडवी, नारीर हुसैन पहेलवान, शकील शेख दगु रेफ्री, वरणगाव उत्तम पहेलवान, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अन्वर खाटीक, सामाजिक कार्यकर्ता ईरफान शेख, ईकबाल रईस मोमीन, शयबाज खान, रावेर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष महेमूद मन्यार, शेख फारुख, रसलपूर ईस्माईल, आवेशा अख्तर पहेलवान, लखन मंडवाले, शाकीब शेख, ईस्माईल खान, साजीद खाटीक, आसीफ शेख, कपील पहेलवान, सलीम तडवी, जाकिर शेख, अशपाक कुरेशी, डीड्या कुरेशी यांनी परीश्रम घेतले.